Wed. Jun 29th, 2022

एसटी बसला गळफास घेत चालकाची आत्महत्या

  अहमदनगरमधील शेवगावयेथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात एसटीली गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आगारात उभ्या असलेल्या एसटीला चालक दिलीप काकडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  दिलीप काकडे हे आगारात चालक म्हणून कार्यरत होते. प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपामध्ये दिलीप काकडे हेसुद्धा सहभागी झाले होते. मात्र आज सकाळच्या सुमारास काकडे यांनी एसटीला गळफास घेऊन आम्तहत्या केली आहे. घटना घडताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप दिलीप काकडे यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.