Fri. Jan 28th, 2022

कामावर रुजू झालेले एसटी कर्मचारी पुन्हा संपात सहभागी

  एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिन करण्याच्या मागण्यासाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संप मागे घेण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पाऊल उचलण्यात आले. राज्यातील अनेक एसटी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. त्यामुळे काही एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले होते. मात्र कामावर रुजू झालेले अनेक कर्मचारी पुन्हा संपात सहभागी झाले आहेत.

  कामावर रुजू झालेले एकूण ३,१७१ एसटी कर्मचारी पुन्हा संपांत सहभागी झाले आहेत. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्येत वाढ झाली आहे. आता एकूण ८८,१२२ एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

  एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी परिवहन मंत्री अनिल परब सकारात्मक असताना महामंडळाकडून एसटी संप चिरडून टाकण्याचे उपाय सुरूच असल्याचा आरोप आझाद मैदानातील आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे.

  एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी राज्यसरकारकडून सतत आवाहन करण्यात येत आहेत. मात्र मागणी पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांवर कारवाई करुनही ते आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यातच महामंडळाने १४ प्रशिक्षणार्थी कामगारांना नियुक्तीपत्र देत कामावर हजर करून घेतले होते. मात्र या बसमधून अवघ्या ४० प्रवाशांनी प्रवास केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *