Jaimaharashtra news

‘एसटीची अवस्था अशी कधीच झाली नाही’ – शरद पवार

   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाबळेश्वर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान त्यांनी राज्यात सुरू असलेल्या एसटी संपावर भाष्य केले. कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ करणे हा पर्याय सरकारला सांगितला असल्याचे शरद पवारांनी सांगितले.

   राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात जो फरक आहे तो फरक भरून काढण्याचे सरकाराल सुचवले असल्याचे पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्वतली जात आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन हे कमी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणे हा पर्याय एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी महत्वाचा ठरू शकतो, असे शरद पवार म्हणाले.

   एसटीची आर्थिक स्थिती अधिकच वाईट झाली आहे. एसटीची अवस्था अशी कधीच झाली नसल्याचे ते म्हणाले. तसेच गेल्या दोन वर्षापासून एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती वाईट असल्याचे शरद पवार म्हणाले.

   एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी राज्यसरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच विलिनीकरणाचा मुद्दा न्यायालयाकडे असल्याचे पवारांनी सांगितले. विलिनीकरणाबाबत न्यायालय जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे शरद पवारांनी सांगितले आहे.

Exit mobile version