Sat. Jul 2nd, 2022

संपकऱ्यांच्या मनधरणीसाठी एसटी अधिकारी थेट घरात

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहेत. दरम्यान संपकऱ्यांच्या मनधरणीसाठी एसटी अधिकारी थेट संपकारी कर्मचाऱ्यांच्या घरात गेले आहेत. एसटी अधिकाऱ्यांनी संपकारी कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा परतण्याची विनंती करण्यात येत आहे.

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. तर अनेकांना पायपीट करत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे संपकारी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. मात्र वारंवार आवाहन करूनही कर्मचारी विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आता थेट एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्यासाठी एसटी अधिकारी थेट त्यांच्या घरात जाऊन विनंती करत आहेत.

एसटी अधिकारी संपकारी कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी कामावर परतण्याची विनवणी करत आहेत. राज्यात सर्वच ठिकाणी अधिकाऱ्यांना हे काम देण्यात आले आहे. परंतु आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी जायला वेळ नसलेले एसटीचे अधिकारी कामावर परतण्यासाठी संपकारी कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन विनंती करत आहेत. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत. तर काही अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.