Tue. Jun 28th, 2022

नागपूरच्या रस्त्यांवर लालपरी

एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपानंतर आता राज्यभरात एसटी महामंडळाच्या गाड्या वेग घेऊ लागल्या आहेत. नागपुरातही एसटी आता पुन्हा भरधाव वेगाने धावू लागली आहे. संपावर असलेले कर्मचारी कामावर पुन्हा रुजू होत असून एसटीला आता प्रवाश्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
नागपूर विभागातील १८०० राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांसह राज्यातील सर्व संपकारी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे नागपुर विभागातील ३९० बस आता रस्त्यावर नियमितपणे धावू लागल्या आहेत. एकूण अठराशे कर्मचारी कामावर परतल्यामुळे सर्व फेऱ्या सुरू करण्याची तयारी राज्य परिवहन मंडळाच्या नागपूर मंडळाने केली आहे. नागपूर विभागात १२७४ फेऱ्या आठ आगरातून सुरू झाल्या आहेत. त्यामुळेचं दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असून प्रवाशांची संख्या आता ५२ हजारांवर पोहचली आहे.
तसेच, मोठ्या कालावधी नंतर एसटी सेवा सुरु झाल्यामुळे नादुरुस्त असलेल्या बसेस दुरुस्त करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू झाले आहे. नागपूर विभागात एकूण २५ ते ३० बसेस नादुरुस्त आहेत, तर अनेकांच्या बॅटरी खराब झाल्या आहेत,या सर्व बसेस सुरू करण्यासाठी यांत्रिक आणि तांत्रिक विभागाचे कर्मचारी कामाला लागले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून संपावार गेलेले नागपुरातील एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतले आहेत. त्यामुळे नागपुरातील लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.