Fri. Sep 24th, 2021

आऊट डेटेट तिकीट मशीन ठरली बॉम्ब

गोंदिया  : सावधान एस.टी चे वाहक जिवंत बाँम्ब घेवून फिरतायेत होय हे खरं आहे. गोंदियात एसटीच्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट झाला आहे. या अपघातात एका महिला वाहकाच्या हाताला दुखापत झाली आहे. या मशीन संदर्भात अनेक तक्रारी होत असताना आता त्यातच ही गंभीर घटना घडल्याने वाहकांमध्ये भीती पसरली आहे. या मशीनमुळे वाहकासोबत प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गोंदियात प्रवाश्यांना तिकीट दिल्यानंतर रूट बदल करीत असताना तिकीट मशिनमध्ये स्फोट होऊन कर्तव्यावर असलेली महिला वाहक गंभीर जखमी  झाल्याची घटना गोंदियाच्या मुख्य बसस्थानक परिसरात घडली आहे . महिला वाहकाचा केवळ पंजा भाजला असून इतर कोणतीही जीवित हानी झाली नाही . ह्या तिकीट वेंडिंग मशीनचा स्फोट झाल्याने महिला वाहकाच्या हाताला दुखापत झाली आहे.

यापूर्वीच्या मशीनच्या तक्रारी कुठल्या

  • कीबोर्ड काम न करणे
  • तिकिटांची रक्कम मशीनमध्ये दाखवणे पण तिकीट चुकीचे छापून येणे.
  • वारंवार हँग होणे
  • आधीही ब्लास्ट झाले आहेत.

कल्पना मेश्रामच्या ह्या घटनेनंतर सर्वांमध्येच एक भीतीचे वातावरण आहे. वाहक किंवा ग्राहक कोणालाही धोका होऊ शकतो. या संदर्भात अनेकांनी महामंडळात तक्रारी दिल्या आहेत. ह्या एकाच ट्रायमॅक्स नावाच्या कंपनीने साल २०१७ ला ह्या मशीन पुरावल्याचे कळते. महाराष्ट्रात ३८ हजार मशीनपैकी तब्बल १० हजार मशीन बंद आहेत. त्यामुळे आता तरी एसटी महामंडळ प्रशासन याची दखल घेणार का? की वाहक आणि प्रवास यांना जीवावर टांगती तलवार घेऊनच प्रवास करावा लागणार असा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *