Thu. May 6th, 2021

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी बसेस सेवेबाबत माध्यमाशी साधला संवाद

मुंबईः राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे . कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेनच्या माध्यमातून बुधवारी रात्री आणखी काही नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. त्यामुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रवासावरही काही निर्बंध आले आहेत. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

एसटी बसेस जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेर देखील चालतील. परंतु त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार आहेत. शिवाय एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल याबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल,’ अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

तसेच, ‘आता सरकारने ज्या काही गाइडलाईन्स दिल्या आहेत, त्यानुसार एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच असतील, त्यामुळं एसटीची संख्या कमी असेल,’ असं त्यांनी सुचना दिली आहे. ब्रेक द चेन अंतर्गत हे काम सुरु आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत असताना यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. ‘विरोधक काय टीका करतात, या पेक्षा लोकांचे प्राण वाचवणं आम्हाला जास्त गरजेचं आहे. त्यासाठी जे काही निर्बंध लावायचे आहेत, ते जी रुग्णसंख्या वाढते आहे ते घटवण्याचं हा प्रयत्न आहे. त्यामुळं आता कोण काय बोलतं या पेक्षा लोकांना कोणताही त्रास होणार नाही, हे पाहणं महत्त्वाचं आहे,’ असं विरोधकांना टोला लगवला आहे. तसेच, बुधवारी रात्री राज्य सरकारने नव्या निर्बंधांची घोषणा केली असून त्यानुसार खासगी प्रवासासाठी जिल्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सर्वसामान्य नागरिकांनी लोकल, गाड्या, मेट्रो, मोनो आणि बस यातून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *