आज मध्यरात्रीपासून एसटीप्रवास महागणार

खासगी ट्रॅव्हलर्स कंपन्यांनी खासगी गांड्यांवर दरवाढ केली होती. खासगी गाड्यांची दरवाढ झाल्यानंतर आता राज्यात मध्यरात्रीपासून एसटीप्रवास महागणार आहे. एसटीची भाडेवाढ १७ टक्के असून मध्यरात्रीपासून एसटीचे नवे दर लागू होणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
आज मध्यरात्रीपासून एसटीबसच्या तिकिटांचा दर वाढणार आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांना आता एसटीप्रवास करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. ‘केंद्र सरकारचे डिझेल दरावर नियंत्रण नसल्यामुळे हे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली असल्याचे’ एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवासांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच आता मध्यरात्रीपासून एसटीप्रवासासाठीही प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.