Thu. Sep 29th, 2022

कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच

राज्यात नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र, एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. विलीनीकरण नाही तोवऱ आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

संपकारी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा परतण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. मात्र वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर रूजू होत नाहीत. त्यामुळे संपकारी कर्मचाऱ्यांवर बडर्फीची कारवाई करण्यात येत आहे. कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच असून आणखी ४ संपकारी एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ८० एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाचे विलीनीकरणाचा विषय डोक्यातून काढून टाका आणि कामावर पुन्हा रुजू व्हा, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान केले. तसेच कृती समितीच्या बैठकितही कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर तोडगा निघालेला नाही. मात्र कर्मचाऱ्यांनी कामावर परत येण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. मात्र संपकारी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून जोवर एसटी महामंडळाचे विलीनीकरण होत नाही, तोवर संप सुरूच राहणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

1 thought on “कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच

  1. I sort of found this blog by mistake, but it caught my attention and I thought that I would post to let you know that I really like it. I enjoyed this post and will be checking back later.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.