Mon. Jan 24th, 2022

नाशकात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरूच आहे. नाशिकमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचीर संपावर गेले आहेत. तर ५० कंत्राटी कर्मचाऱ्यांद्वारे एसटी बससेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नाशिकमधील संपकारी कर्मचाऱ्यांपैकी एकूण २० ते २५ टक्के कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू होण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. मात्र वारंवार आवाहन करूनही कामावर न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत नाशिकमधील १७५ एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.

नाशिकमधील कर्मचारी संपावर गेल्यामुळे एसटी बससेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अडथळे येत आहेत. मात्र प्रशासनाने ५० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटी बससेवा सुरू केली. त्यामुळे त्यामुळे नाशिक विभागात काही प्रमाणात का होईना बस सेवा सुरु करण्यात एसटी महामंडळ प्रशासनाला यश आले आहे. तसेच एसटी बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *