Sat. Aug 13th, 2022

आर्थिक अडचणींनंतरही मालेगावात एसटी कर्मचारी संपावर ठाम

मालेगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच दुसरीकडे राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींनंतरही विलिनीकरणाची मागणी मान्य होत नाही तोवर मालेगावातील एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

एसटी कर्मचारी एकजूट असून संप हाणून पडण्याचा प्रयत्न सरकाकडून केला जात आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात दबाव आणून एसटी बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही संपकऱ्यांची एकजूट सरकार फोडू शकत नाहीत, असे मालेगावातील एसटी आंदोलकांच्यावतीने सांगण्यात येत आहे.

एसटी आंदोलनकर्ते विलिनीकरणावर ठाम असल्याचे चित्र मालेगावात दिसून येत आहे. मालेगाव विभागातील बस सेवा अनेक दिवसांपासून सुरू असल्याने प्रवाशांनी आता एसटी आगाराकडे फिरकणे बंद केले असून, प्रवासी पर्यायी वाहनांनी वाहतूक करत आहेत. तसेच आंदोलन सुरू झाल्यापासून एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नात लाखोंच्या पटीने नुकसान होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.