Mon. Jan 17th, 2022

नाशिकमध्ये एसटी कर्मचारी संपावर ठाम   

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर आज एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ संघटनांच्या कृती समितीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नाशिकमधील एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संप मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना वारंवार करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला. तरीही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. याच पार्श्वभूमीव एसटी कर्मचाऱ्यांची कृती समितीच बैठक पार पडली. तसेच या बैठकिमध्ये एसटी महामंडळ विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नाशिकमधील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. तर विलीनीकरणाची प्रमुख मागणी पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

विलीनीकरणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहेत. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा कामावर येण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *