Tue. Jun 15th, 2021

#Coronavirus चा फटका, अधिवेशन शनिवारीच गुंडळाणार

करोना व्हायरसची लागण महाराष्ट्रातही पोहोचल्यामुळे त्याचा परिणाम अधिवेशनावर झाला आहे. आमदारांना आपआपल्या मतदारसंघात परतून काम करता यावं, म्हणून राज्य सरकारने अधिवेशन शनिवारपर्यंत गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.

Corona Virus चे रूग्ण महाराष्ट्रातही आढळून आल्यावर आता सर्वांनीच याचा धसका घेतला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेलं अधिवेशनही लवकर गुंडाळण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 20 मार्चपर्यंत होणार होतं. मात्र ते  शनिवारपर्यंत गुंडाळण्याचा प्रस्ताव विधानसभेत आज मांडण्यात आला. त्याला विरोधी पक्षांनीही अनुमोदन दिलं. त्यामुळे हा प्रस्ताव तात्काळ मंजूर झाला. याचा परिणाम म्हणजे अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी 3 दिवसांचाच अवधी आहे.

आमदारांना लवकरात लवकर आपल्या मतदारसंघात परतता यावं आणि तेथे Corona Virus संदर्भात आवश्यक ती मोहिम राबवता यावी, यासाठी शनिवारीच अधिवेशन संपवण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या तीन दिवसांत अधिवेशनाचं कामकाज जलदगतीने पूर्ण करावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *