उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे योग्य उपाययोजनांवर चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित करण्यात येणार आहे. तसेच मालमत्ता करातून सूट देण्याबाबतच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावावर चर्चा होणार आहे. दरम्यान स्कूल बसना वाहन करातून १०० टक्के सूट देण्याबाबतचा निर्णय बैठकित अपेक्षित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. त्याचसोबत ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येवरही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच टाळेबंदी काळात वार्षिक कर भरणाऱ्या स्कूल बसना १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२१पर्यंत वाहन करातून १०० टक्के सूट देण्याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.