Tue. Jan 18th, 2022

शॉपिंग मॉलमधील प्रवेशाबाबत सुधारित आदेश

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट ओसरली असल्याने आता राज्यात अनेक निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्याचबरोबर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता काळजीपूर्वक पावलं उचलली जात आहेत. मुंबईत लोकल प्रवासासाठी दोन लस घेतलेल्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील मॉलसाठी नियमावली आखण्यात आली आहे. आता राज्यातील सर्व मॉल्सना सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी सरकारने काही नियम घालून दिले आहेत.

  • शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक
  • कर्मचाऱ्यांनी लसीच्या दोन मात्रा घेणं आवश्यक
  • दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले पाहीजेत
  • लसीकरण प्रमाणपत्र व त्यासोबत प्रवेशद्वारावर ओळखपत्र दाखवावं लागेल

दुसरीकडे, मॉलमध्ये लहान मुलांच्या प्रवेशाबाबतही सरकारनं आदेश जारी केला आहे. सुधारित आदेशानुसार १८ वर्षाखालील मुलांना मॉलमध्ये प्रवेशासाठी वयाचा पुरावा दाखवावा लागणार आहे. १८ वर्षाखालील मुलांचं लसीकरण अद्याप सुरु झालं नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. १८ वर्षाखालील मुला मुलींना मॉलमध्य़े प्रवेशासाठी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचं वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवणं आवश्यक राहील.

अडीच कोटी लोक दुसऱ्या लसीकरणाच्या प्रतिक्षेत!

दरम्यान, डेल्टा प्लस या नवीन आजाराचे रूग्ण देखील आढळून येत आहेत. शिवाय, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. दररोज राज्यात आढळणारी नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या तुलनेत कधी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ५ हजार ८११ रूग्ण कोरोनातून बरे झाले, तर ४ हजार १४५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय राज्यात आज १०० कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *