Sun. Oct 24th, 2021

राज्य सरकारचे शेतकऱ्यांना निवडणुकापूर्वीेची मोठी भेट

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’साठी पात्र नसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.या योजनेची घोषणा आगामी अर्थसंकल्पात केली जाणार आहे.

शेतकऱ्यांसाठी काय नव्या योजना ?

दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार.

शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांचे अनुदान दिले जाणार.

यासाठी अर्थसंकल्पात 4 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार.

शेतकऱ्यांना वार्षिक अनुदानासह इतर अनेक सवलती देखील देण्यात येणार आहेत.

सात लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ही स्वतंत्र योजना सुरु केली आहे.

शेतकऱ्यांमध्ये विद्यामान सरकारविरोधात नाराजीचा सूर असल्याचे पाहायला मिळाले.

गुरवारी नाशिकमधून विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला होता.

या अंदोलनाला थांबवण्यात सरकारला यश आले.

मात्र निवडणुका तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची ही नाराजी सरकारला परवडणारी नाही.

या योजनेच्या माध्यमातून सरकार नाराज शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *