आता वसई ते पेण MMRDAच्या हद्दीत

आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत अलिबाग, पनवेल, पेण, खालापूर आणि वसई या भागांना एमएमआरडीए क्षेत्रात जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पालघरमधील वसई ते पेणपर्यंतचा भागामध्ये विकासकामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

बैठकीत काय निर्णय घेतला ?

या भागातील विकासकामे रखडलेल्या अवस्थेत असल्यामुळे या भागांमधील जाणारे रस्ते कोणी दुरुस्त किंवा नव्याने बनवायचे याविषयावर तोडगा मिळत नाही.

तसेच या भागातील विकासकामे कोणी करायची असाही मुद्दा उपस्थित होत असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे.

एमएमआरडीए या क्षेत्रात जर आणले तर विकास जलदगतीने होईल या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.

 

 

Exit mobile version