Sat. Apr 4th, 2020

राज्य सरकारचा गिरणी कामगारांना मोठा धक्का

गिरणी कामगारांच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आता पहायला मिळत आहे.सरकारने गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मोठा विलंब होत आहे.

यामुळे कामगारांमध्ये नाराजीचा सूर आहे. गिरणी कामगांराच्या प्रश्नाकडे सरकार हे गांभिर्याने लक्ष देत नसल्याचे समोर येत आहे. गिरणी कामगारांना एक धक्का देणारा निर्णय सरकारने घेतला आहे.

गिरणी कामगारांच्या घरांच्या किमतीमध्ये अचानक वाढ केला आहे. आधीच्या किंमतीच्या दुप्पट वाढ केली असल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे गिरणी कामगार आक्रमक झाले आहेत.

गिरणी कामगारांच्या घरांविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीत या घरांची किंमत दुप्पट झाल्यामुळे कामगार संघटनांचे प्रतिनिधी अवाक् झाले आहेत. गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमती अचानक साडेनऊ ऐवजी अठरा लाख केले आहे.

ही किंमत वाढवण्याची कोणतीही माहीती दिली नसल्याने गिरणी कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परस्पर निर्णयाच्या कामगारांनी निषेध व्यक्त केला आहे.

तसेच या निर्णयाविरोधात आक्रमक भुमिका घेत आंदोलनाचा इशारा गिरणी कामगारांनी दिला आहे. असे गुरूवारी झालेल्या बैठकीत गिरणी कामगार संघटनेचे प्रवीण घाग यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *