सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू

राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्यात यावा, असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवला असल्याची माहिती काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती.
त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू होण्याबाबत आज महत्तवाची माहिती दिली आहे. येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सरू होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता २४ जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे.
राज्यातील शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुर होणार असून पालकांची संमती असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार आहे तसेच पहिली ते बारावी आणि शिशुवर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकाने दिला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.
काय आहेत नियम?
२४ जानेवारीपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू.
शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे कोरोनाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक.
स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार.
स्थानिक प्रशासनाने निर्णय घेताना परिस्थितीचा अंदाज घेणे.
शाळेत जाऊन लसीकरण प्रक्रिया करण्यात येईल, याची पडताळणी घेणे.
Thanks-a-mundo for the blog article.Really looking forward to read more. Really Great.
Sick! Just received a brand-new Pearl and I can now read your blog on my phone’s browser, it didn’t function on my previous 1.