Sat. Jun 19th, 2021

महाराष्ट्रात सवर्णांना 10% आरक्षण लागू, मंत्रिमंडळाचा निर्णय

सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक आनंदाची बातमी… राज्य मंत्रिमंडळाने आर्थिकदृष्टया मागास वर्गाला १० टक्के आरक्षण देण्यास मंजूरी दिली आहे. आज राष्ट्रपती कोविंद यांनी 10 टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केल्यामुळे विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे.

कसा घेण्यात आला निर्णय?

सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती.

या विधेयकाला लोकसभेत आणि राज्यसभेत मोठ्या बहुमताने मंजुरी मिळाली.

यामुळे खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागासांना शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला संसद आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यामुळे अनेक राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रसह उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने सुद्धा 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली होती.

मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना 10% आरक्षणाची तरतूद झाली आहे.

 

संबंधित बातमी- सवर्णांना 10 टक्के आरक्षण: स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *