‘वीजेशिवाय राज्य अधोगतीकडे जाईल’ – चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात कोळसाचा साठा अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कोळशाअभावी राज्यात वीज संकट कोसळण्याची शक्याता आहे. यावरून राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोळशाअभावी राज्यात वीज संकट कोसळले आहे. तर राज्यात भारनियमन होत आहे. तसेच वीजेशिवाय राज्य अधोगतीकडे जाईल, अशा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ऊर्जा विभागाचा कॅश फ्लो बिघडण्याचं काम केलं आहे. त्यामुळे रेल्वे, एनटिपीसी, डब्ल्यूसीएल, खासगी कंपन्या यांचे थकीत वाढल्यामुळे राज्याला भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. तसेच काँग्रेसबद्दल जनतेच्या मनात रोष निर्माण करण्यासाठी राज्य सरकार हे सर्व करत असल्याचा आरोप माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
तसेच, राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळश्याचा साठा शिल्लक आहे. तसेच तीन दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याने वीज पुरवठ्याची अडचण येण्याची शक्यता आहे. वीज निर्मितीसाठी कोळसा आणि पाण्याचे संकट उभे झाले की, वीज निर्मिती करण्यास अडचण निर्माण होईल. त्यामुळे केंद्राने राज्याल कोळसा उपलब्ध करून देण्याची मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.