Sun. Aug 18th, 2019

पर्यटकांसाठी पश्चिम रेल्वे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ नवं स्टेशन

0Shares

नर्मदा नदीकाठी सरदार सरोवरामध्ये उभारण्यात आलेली देशातील सर्वात भव्य प्रतिमा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पर्यटकांना या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून पोहोचता यावे यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासन नव्या स्टेशनचे निर्माण करणार आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य प्रतिमा ज्या ठिकाणी विराजमान आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना पोहोचण्यासाठी 5 किलोमीटर अंतरावर केवडिया या स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. हे रेल्वे स्टेशन अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी ही माहिती दिली आहे. येत्या 15 डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन करणार आहेत. यादरम्यान रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीही उपस्थित राहणार आहेत. केवडिया रेल्वे स्टेशन निर्माणासाठी जवळपास 20 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येणार आहे. या रेल्वे स्टेशनचे काम सप्टेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.

केवडिया स्टेशनची इमारत 3 मजली असणार आहे. पहिल्या 2 मजल्यांवर रेल्वे संबंधित सुविधा पुरवण्यात येणार आहेत तर तिसऱ्या मजल्यावर एक आर्ट गॅलरीही बनवण्यात येणार आहे. तसेच या गॅलरीमध्ये स्थानिक आदिवासी जाती यांची कला आणि शिल्पकला प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *