Mon. Dec 6th, 2021

शिवस्मारकाचे बांधकाम बंदच; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर त्वरीत सुनावणी घेण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची ही मागणी फेटाळली आहे. त्यामुळे शिवस्मार्काचे काम काही काळासाठी बंद राहणार आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मुंबई येथील अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचे काम सुरू होते.

मात्र  कन्झर्वेशन अॅक्शन ट्रस्ट नामक स्वयंसेवी संस्थेने या स्मारकाचा विरोध केला.

स्मारकामुळे पर्यावरणाला हानी निर्माण होऊ शकते.

यामुळे स्मारकाच्या बांधकामाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली.

देबी गोयंका यांनी स्मारकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली.

या याचिकेवर लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी विनंती राज्य सरकारने न्यायालयाला केली.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी  ही याचिका फेटाळली.

तसेच स्मारकाचे बांधकाम बंद राहील.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेशापर्यंत काम बंदच ठेवण्याचे आदेश दिले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *