Thu. Dec 2nd, 2021

…म्हणून रायगडमध्ये चार धबधब्यांवर बंदी, पर्यटकांमध्ये नाराजी

धबधब्यांवर वाढत्या दुर्घटनांमुळे महसुल विभाग आणि पोलिसांकडून रायगड जिल्ह्यातील चार पावसाळी पर्यटनस्थळांवर बंदी घातली आहे.

धबधब्यांवर वाढत्या दुर्घटनांमुळे महसुल विभाग आणि पोलिसांकडून रायगड जिल्ह्यातील चार पावसाळी पर्यटनस्थळांवर बंदी घातली आहे. त्यापैकी पाटणुस ग्रामपंचायत हद्दीतील देवकुंड या धबधब्याचाही समावेश आहे. मुख्य रस्त्यापासुन गावापर्यंत बंदीचे पोस्टर लावून पोलीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी देवकुंड धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करीत आहेत. यामुळे पाटणुस गावामध्ये शुकशुकाट पसरला आहे. तर गावत पर्यटक येत नसल्याने ग्रामस्थांचा व्यवसाय बंद पडला आहे.

या कारणास्तव धबधब्यांवर बंदी

पावसाळा सुरू झाला की धबधब्यांवरती पर्यटकांची गर्दी होते. मात्र रायगडमधील चार धबधब्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

धबधब्यांवर वाढत्या दुर्घटनांमुळे महसुल विभाग आणि पोलिसांकडुन हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाटणुस ग्रामपंचायत हद्दीतील देवकुंड धबधब्यावरही पोलीस आणि ग्रामस्थांनी बंदी घातली आहे.

ओढे, डोंगराचे चढउतार पार करुन देवकुंड धबधब्यावर पोहोचता येते. त्यामुळे पर्यटकांसाठी हा धबधबा आकर्षण ठरतो.

देवकुंड धबधबा बंद असल्याने उत्पन्नावर परिणाम

विळे- भागड औद्योगिक वसाहतीपासुन जवळ असलेल्या पाटणुस गाव हद्दीत हा धबधबा येतो. देवकुंड हा धबधबा म्हणजे केवळ धबधबा नसुन सुमारे सात किलोमिटरचा अवघड असा ट्रेक आहे.

ओढे, डोंगराचे चढउतार पार करुन देवकुंड धबधब्यावर पोहोचता येते. त्यामुळे पर्यटक आणि निसर्गप्रेमीसाठी हा धबधबा आकर्षण ठरतो. या धबधब्यावरील बंदीमुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

मुख्य रस्त्यापासुन दुर गाव असल्याने गावात उत्पन्नाचे साधन नाही. येथे येणारे पर्यटक हा येथील ग्रामस्थांचा उत्पन्नाचा मार्ग आहे.

हॉटेल, लॉजिंग, गाईड आणि इतर सुविधा दिल्याने पाटणुस परीसरातील ग्रामस्थांना चांगले उत्पन्न मिळते. धबधब्यावरी बंदीमुळे ग्रामस्थांचे उत्पन्न बंद झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *