Mon. Jul 26th, 2021

कोस्टल रोडच्या कामावर स्थगिती कायम – सर्वोच्च न्यायालय

कोस्टल रोडच्या कामावर स्थगिती कायम असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे मुंबई महापालिकेला मोठा धक्का बसला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. तसेच राज्य सरकारला नोटीस बजावून महपालिकेच्या आव्हान याचिकेवर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहे.

कोस्टल रोडवरील स्थगिती कायम –

कोस्टल रोडच्या कामावर स्थगिती कायम असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबई महापालिकेला मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईला जोडण्याऱ्या कोस्टल रोडसाठी समुद्रालगत मोठा भराव टाकण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याने स्थानिक रहिवाशी, सामाजिक कार्यकर्ते आणि मच्छीमारांनी  विरोध केला आहे.

तसेच प्रकल्पाला मिळालेल्या सीआरझेडच्या परवानग्या रद्द केल्या आहेत.

या प्रकरणी पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *