संतापजनक! सावत्र बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र बापनेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती पीडित मुलीच्या आईने पोलिसांना सांगितली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार आळंदी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपी बापाला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं ?

पिंपरी-चिंचवडमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

सावत्र बापानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

काही वर्षांपूर्वी पीडिताच्या वडिलांचे निधन झाले.

त्यामुळे पीडितेच्या आईचे पुन्हा एकदा लग्न लावून देण्यात आले होते.

गेल्या दोन वर्षांपासून सावत्र बाप आणि पीडिताची आई एकाच कंपनीत काम करत होते.

या कंपनीत दोघेही दिवस तसेच रात्रपाळी दरम्यान काम करत होते.

मात्र 2 मे रोजी पीडित मुलीच्या आईची दिवसपाळी असल्यामुळे ती दिवसा कामावर गेली होती.

त्याचदरम्यान सावत्र बापाची रात्रपाळी असल्यामुळे तो नुकताच घरी परतला होता.

पीडित मुलीला घरी एकटच पाहून सावत्र बापाने संधी साधत तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला.

हा सर्व प्रकार पीडित मुलीने दिवसपाळी करून आलेल्या आपल्या आईला सांगितला.

आईने त्वरीच पोलीस स्थानकात धाव घेत सर्व घटना आळंदी पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

Exit mobile version