Sun. Jun 20th, 2021

अमित शाह यांच्या कोलकाताच्या ‘रोड शो’ मध्ये दगडफेक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी कोलकातामध्ये रोड शोचे आयोजन केले होते. मात्र या रोड शो दरम्यान मोठा गोंधळ झाला आहे. यामध्ये भाजप- तृणमूल कॉंग्रेसमध्ये मोठा वाद उफाळून आला आहे. रोड शोच्या दरम्यान अमित शाहांच्या गाडीवर काठ्या फेकण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्यवर गाडीवर दगडफेक करण्यात आली.

नेमकं काय घडलं ?

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रोड शोचे आयोजन केले होते.

या रोड शो दरम्यान अमित शाह यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे.

यामुळे भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक झाली.

तसेच यावेळी एक वाहनाची जाळपोळही करण्यात आली आहे.

रोड शो होण्यापूर्वी कोलकाता पोलिसांनी भाजपाचे झेंडे आणि फलकही काढण्यात आले होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *