Jaimaharashtra news

कांजुरमार्ग स्थानकावर अज्ञातांकडून दगडफेक; एक तरुणी जखमी

पावसामुळे मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल गेल्या 2-3 दिवसांपासून कोलमडली आहे. त्यामुळे प्रवाशांची स्थनकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीमुळे चेंगरा-चेंगरी आणि श्वास कोंडल्यासारखे प्रकार घडतात. मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग ते विक्रोळी स्थानकादरम्यान एका अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक तरुणी जखमी झाली आहे.

नेमकं काय घडलं ?

मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग ते विक्रोळी रेल्वे स्थनकांदरम्यान अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली.

या दगडफेकीत एक तरुणी जखमी झाली असून घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

त्याचबरोबर गर्दीची वेळ असल्यामुळे एका तरुणीचा श्वास कोंडला गेल्याने भोवळ आली.

त्यामुळे तिच्यावर देखील उपचार करण्यात येत आहेत.

गेल्या 2-3 दिवसांपासून लोकल वेळपत्रकानुसार धावत नसून प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

 

 

Exit mobile version