Fri. Oct 18th, 2019

बाजारातले खजूर खाताय? सावधान!

सध्याच्या युगात भेसळ इतकी झाली की काय खावं आणि काय टाळावं असा प्रश्न निर्माण होतोय. कारण सध्या कोणत्या अन्नपदार्थातून काय निघेल, याचा नेम राहिला नाहीये. पिंपरीनजिकच्या पिंपळे सौदागर येथे एका व्यक्तीने खजूर विकत घेतले आणि पाकिटात चक्क छोटे छोटे दगड निघाले आहे.

शहरातील एका किराणा दुकानावरून खजुराचं पाकीट ग्राहकाने विकत घेतलं.

त्यानंतर तो घरी आला आणि त्याने पॅकेट फोडून काही खजूर खाल्ले.

मात्र तेव्हा धक्कादायक बाब समोर आली.

खजुराच्या पाकिटात चक्क छोटे छोटे दगड होते.

काही खजूर खाल्याने या व्यक्तीच्या पोटातही दगडाचा अंश गेला.

अशा खजूर बनविणाऱ्या कंपन्यांवर त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी असाच खेळ सुरू राहील. अन्न औषध प्रशासन या अश्या बनावट कंपनी विरोधात काय कारवाई करेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *