Tue. Oct 26th, 2021

#HappyBirthdayVinodKhanna त्यांचा अभिनय आजही स्मरणात

कशी झाली बॉलिवूडमध्ये विनोद खन्नाची एन्ट्री

80चे दशक गाजवणारा प्रसिद्ध अभिनेता विनोद खन्ना यांचा वाढदिवस आहे. अभियनयाच्या जोरावर विनोद खन्ना यांनी चाहत्यांच्या मनात आगळी-वेगळी छाप सोडली आहे. आजही त्यांचा अभिनय, चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. स्वत:च्या कर्तुत्वावर बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख अभिनेता विनोद खन्ना यांनी निर्माण केली. आज विनोद खन्ना या जगात नाही मात्र त्यांच्या अभिनयाच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या मनात ते अजूनही जिवंत आहेत. विनोद खन्ना यांच्यासोबत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी कामं केली आहेत. त्यांच्या अभिनयासह त्यांच्या आगळ्या वेगळ्या अदांवर अनेक अभिनेत्री फिदा होत्या. विनोद खन्ना यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ते मनापासून साकार करत असल्यामुळे भान हरवून सीन करत. त्यामुळे विनोद खन्ना अनेक वादात सुद्धा अडकले होते.

विनोद खन्ना यांचा जन्म :

विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 रोजी पाकिस्तानमधील पेशावर येथे झाला.

भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर विनोद खन्ना यांचे कुटुंब मुंबईला स्थलांतर झाले.

भारतात त्यांचे वडील कापड व्यवसाय करत होते.

 

कॉलेज लाईफ :

विनोद खन्ना यांचे शिक्षण मुंबई आणि दिल्लीत झाले. वडिलांच्या आग्रहपायी विनोद खन्ना यांनी व्यवसाय सांभाळला.

कॉलेज लाईफमध्ये त्यांनी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

तिथेच त्यांची भेट गितांजलीसोबत झाली. त्यांच्यात चांगली मैत्री जुळली आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीच रुपांतर प्रेमात झाले. जेव्हा त्यांनी वडिलांना त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना बंदूकीचा धाक दाखवला होता असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

 

 

बॉलिवूमध्ये एन्ट्री :

विनोद यांची पार्टी दरम्यान भेट सुनील दत्त यांच्याशी झाली होती. ते एका सिनेमात आपल्या भावाच्या भूमिकेसाठी नवीन चेहरा शोधत होते.

सुनील यांनी ही भूमिका विनोद यांना ऑफर केली. मात्र जेव्हा यांच्या वडिलांना ही सर्व माहिती मिळाल्यानंतर त्यांना बंदूकीचा धाक दाखविण्यात आला.

त्यानंतर त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. विनोद खन्ना यांनी एका आठवड्यात 15 चित्रपट साईन केले होते. त्यांचा पहिला सिनेमा ‘मन की मीत ‘ हा आहे.

 

विनोद खन्ना यांचा विवाह :

विनोद यांना यश मिळाल्यानंतर त्यांनी गीतांजलीशी विवाह केला.

या दोघांच्या जीवनात दोन गोंडस बाळांचा जन्म झाला.

विनोद खन्ना यांनी ओशोंशी प्रभावित होऊन त्यांनी आपले वैवाहिक आयुष्य उध्वस्त केले.

विनोद खन्ना यांनी पुण्यातील ओशो यांच्या आश्रमात जाण्यास सुरुवात केली.

1957मध्ये सिनेमामधून संन्यास घेतला.

तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर विनोद खन्ना ओशोंसोबत अमेरिकेला गेले. तिथे 5 वर्ष राहिल्यानंतर भारतात परतले आणि पत्नीला घटस्फोट दिला.

त्यांनी 1990ला त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कविता होते. दुसऱ्या लग्नापासून त्यांना दोन मुले झाली.

 

राजकारणात विनोद खन्नाचे पदार्पण –

विनोद खन्ना 1997मध्ये त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि भारतीय जनता पार्टीत समावेश झाले.

राजकारणात ते चांगलेच सक्रिय होते.

 

विनोद खन्ना यांचा अखेरचा श्वास :

विनोद खन्ना यांचे निधन 27 एप्रिल 2017 रोजी झाले. त्यांना कॅन्सर झाल्यानं त्यांचे निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *