Tue. Sep 27th, 2022

नाशिक प्रशासनाकडून अजब टेंडर

देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मात्र दरम्यान, नाशिक प्रशासनाकडू अजब टेंडर सादर करण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत नाशिक महापालिकेने हास्यास्पद भविष्यवाणी केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नाशिकमध्ये १७ हजार नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा दावा, नाशिक प्रशासनाने केला आहे.

नाशिक महापालिकने अंत्यसंस्कार करण्यासाठी कंत्राट सादर केले आहे. कोरनाच्या तिसऱ्या लाटेत १७ हजार नागरिंचा मृत्यू झाल्याचा दावा करत गुरुवारी महासभेत सव्वातीन कोटींचे अजब कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेची कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत हास्यास्पद भविष्यवाणी केली असल्याची चर्चा करण्यात येत आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १९२५ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासन चिंतेत आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४२८ कोरोना रुग्ण, मालेगाव ४७ तर जिल्हाबाह्य ८२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान जिल्ह्यात सध्या ७ हजार ८२४ कोरोना रुग्ण आहेत.

1 thought on “नाशिक प्रशासनाकडून अजब टेंडर

  1. I Really like your blog! Ideal important information that has been truly helpful. I hope you and your loved ones have a very good day!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.