Tue. Jun 2nd, 2020

ATM मध्ये घुसून महिलेला दाखवलं गुप्तांग, विकृत इसम अटकेत!

मुंबईमधील मुलुंड येथे पोलिसांनी एका विकृत तरुणाला अटक केलं आहे. या विकृत तरुणाने ATM मध्ये शिरून एका महिलेसमोर अश्लील चाळे केले होते. महिलेने अत्यंत हुशारीने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ट्वीट केला. हे Tweet पाहून पोलिसांनी संबंधित आरोपीला अचक केलंय.

काय घडलं होतं नेमकं?

रात्री अडीचच्या सुमारास एक महिला मुलुंड पूर्व येथून रिक्षेने प्रवास करत होती.

रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी ती जवळच्या ATM मध्ये शिरली.

त्याचवेळी एक विकृत तरुणही ATM सेंटरमध्ये घुसला.

प्रथमतः त्या महिलेने या तरुणाकडे दुर्लक्ष केलं.

हा तरुण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला.

मात्र तरीही महिलेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

तेव्हा या तरुणाने तिला आपलं गुप्तांग दाखवलं.

या प्रकराने ही महिला घाबरून गेली.

मात्र प्रसंगावधान राखत तिने हा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला.

तेव्हा हा विकृत तरूण तोंड लपवून पळून गेला.

त्यानंतर या महिलेने हा संपूर्ण प्रकार व्हिडिओसकट ट्वीट केला.

पोलिसांनी हे tweet पाहून ताबडतोब कारवाईला सुरूवात केली.

तपास करून पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलंय. त्याच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी महिलेशी गैरवर्तन आणि अश्लील चाळे केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *