Jaimaharashtra news

स्ट्रॉबेरीचे फायदे आणि तोटे

मुंबई : हिवाळ्यात स्ट्रॉबेरी हे फळं खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी फळ हे हिवाळ्यात भरपूर प्रमाणात विक्रीसाठी येतात. या काळात हंगामी फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. जर हिवाळ्यात आपण आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश केला तर आपल्या शरीराला बरेच फायदे होतात. स्ट्रॉबेरीपासून खनिजे आणि जीवनसत्त्वे हे मिळतात. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यात पॉलिफेनोल्स नावाचे अँटी-ऑक्सिडेंट देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे बरेच फायदे आपल्याला मिळू शकतात.

स्ट्रॉबेरीचे फायदे :

१ स्ट्रॉबेरीमध्ये मॅंगनीज, व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि व्हिटामिन बी 9 असते.

२ स्ट्रॉबेरी हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.

३ जर आपण ताजे स्ट्रॉबेरी घेऊ शकत असाल, तर ते चांगले आहे. कारण स्ट्रॉबेरीचे सेवन आपल्याला हृदयरोग आणि मधुमेहपासून मुक्त करू शकते.

४ स्ट्रॉबेरीमध्ये सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसते आणि कमी कॅलरीयुक्त आहार म्हणून स्ट्रॉबेरी उत्तम पर्याय आहे.

५ स्ट्रॉबेरीत तंतुमय पदार्थाचा मोठया प्रमाणात आढळतं म्हणुन स्ट्रॉबेरी आपल्या आतड्यांना स्वस्थ ठेवते

६ एंथोसायनिन हे लाल रंगाचे अँटिऑक्सिडंट देखील स्ट्रॉबेरीत सापडतं यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होते

७ स्ट्रॉबेरीत असणारे अँटीऑक्‍सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात.

स्ट्रॉबेरीचे तोटे

१ स्ट्रॉबेरीचे जास्त सेवन केल्यास आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढवते. त्यामुळे स्ट्रॉबेरी हे योग्य प्रमाणात खावे.

२ स्ट्रॉबेरीचे जास्त सेवन केल्यास खोकला होऊ शकते.

३ स्ट्रॉबेरी ही पित्त वाढवणारी आहे.

४ पित्ताच्या उलट्या होत असल्यास स्ट्रॉबेरीचे सेवन करून नये.

Exit mobile version