Sun. May 16th, 2021

डॉक्टरांचा हलगर्जीपणा, फरशीवर पडल्याने नवजात बालकाचा मृत्यू

औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात एका गर्भवती महिलेला स्ट्रेचर न मिळाल्याने चालतच लिफ्टपर्यंत जावे लागले. या दरम्यान महिलेची प्रसूती लिफ्टजवळच झाली आणि नवजात बालक फरशीवर पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने घाटी रुग्णालयातील दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

  • औरंगाबादमधील एका महिलेला मंगळवारी संध्याकाळी प्रसूतीकळा सुरु झाल्या.
  • त्यामुळे कुटुंबीयांनी तिला आधी एका खासगी रुग्णालयात नेले.
  • मात्र तिथे गेल्यावर कळा थांबल्याने महिलेला पुन्हा घरी पाठवण्यात आले.
  • रात्री उशिरा महिलेला पुन्हा प्रसूतीकळा सुरु झाल्या.
  • कुटुंबीय तिला घेऊन पुन्हा रुग्णालयाच्या दिशेने निघाले.
  • घाटी रुग्णालय येईपर्यंत महिलेला प्रसूतीकळा असह्य झाल्या.
  • शेवटी तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • घाटी रुग्णालयात स्ट्रेचर नव्हते. त्यामुळे महिलेला चालतच लिफ्टपर्यंत जावे लागले.
  • महिलेला लिफ्टजवळच प्रसूती झाली आणि नवजात बालक जमिनीवर पडले.
  • यात त्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेने महिलेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *