मुंबईत आजपासून प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी

मुंबईत आजपासून प्लास्टिकबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

प्लास्टिकबंदीचा कायदा केल्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने, १ मार्चपासून प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचा मानस पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

यानंतर मुंबई महानगरपालिकेने प्रतिबंध असलेलं प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं ठरवलंय.

ही कठोर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कारवाई केली जाणार आहे.

प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिका सज्ज झाली आहे.

कारवाईसाठी महानगरपालिकेच्या २४ विभागीय कार्यालयांमध्ये अनुज्ञापन, बाजार, दुकान आणि आस्थापना आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे पथक तयार केलं आहे.

हे पथक आजपासून अनेक ठिकाणी धाडी मारणार आहेत. मंगळ कार्यालय, उपहारगृह कार्यालयं यांची कसून चौकशी केली जाणार आहे.

असा असेल दंड

प्रतिबंधित असलेलं प्लास्टिक वापरल्यास पहिल्यांदा ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यानंतर दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार रुपयांचा दंड द्यावा लागणार आहे.

तसेच तिसऱ्यांदा सापडल्या, २५ हजार आणि तीन महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

दरम्यान राज्यात 23 जून २०१८ पासून प्लास्टिक बंदीची लागू करण्यात आली आहे.

Exit mobile version