तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम; गेट वे ऑफ इंडियाचा तुटला कठडा

मुंबई :  मुंबईत तौक्ते चक्रीवादळा हाहाकार सुरू आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस पडला असून जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडले आहे तर कुठे विजेचे खांब पडल्यानं मुंबईत वीज गेल्याचं चित्र दिसत आहे. या चक्रवादळामुळे मुंबईचं खूप नुकसान झालं आहे. मुंबईत काही ठिकाणी काम ठप्प झालं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणीचा सामाना करावा लागत आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेट वे ऑफ इंडिया येथील कठडा तुटला आहे. परिसरात मोठी पडझड झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनाकडून सफाईचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर करणार गेट वे ऑफ इंडिया परिसराची पाहणी करणार आहेत.

Exit mobile version