Thu. Jun 17th, 2021

रत्नागिरीत चक्रीवादळाचा हाहाकार

रत्नागिरी :  जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळाचा धुमाकूळ संपूर्ण रात्रभर सुरूच होता. या वादळाने जिल्ह्याची धुरा ओलांडल्यानंतरही वादळी हे थांबलं नाही. वाऱ्याने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या वादळाचा मोठा फटका बसला. रत्नागिरीतील मिरकरवाडा परिसरात या वादळामुळे मोठे नुकसान झाले. तोक्ते चक्रीवादळाने मिरकरवाडा परिसराला झोडपून काढलं आहे. रात्रभर सुटलेल्या वादळी पावसाने मिरकरवाडा परिसरात दाणादाण उडवली . तसेच मिरकरवाडा जेटीवर उभ्या नौकाना वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे शिवाय जोरदार वाऱ्यामुळे नौका एकमेकांवर आदळत होत्या. वारा हा सतत सुरू होता. त्यामुळे भीतीपोटी मच्छीमारांनी रात्रभर जागून काढली. दरम्यान मिरकरवाडा पांढरा समुद्र येथील कांचन ओशियन २व्यु समोरील भिंत कोसळली. या भिंतीखाली अनेक गाड्या दबल्यानं अनेकांचं मोठ नुकसान झाले आहे. भिंत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक सोहेल साखरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी मच्छीमारांच्या मदतीसाठी रात्र जागून काढली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *