Wed. Aug 10th, 2022

पुण्यात एसटीची पहिली ई- बस ‘शिवाई’ धावणार

दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दार , वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणारी इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला आहे .
राज्य परिवहन मंडळाची पहिली बस १ जून १९४८ ला पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली होती. या बस सेवेला उद्या ७४ वर्ष पूर्ण होणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील पहिली शिवाई ई- बस बुधवारपासून अहमदनगर ते पुणे या मार्गावर धावणार आहे. या पहिल्या ई- बसची प्राथमिक चाचणी मंगळवारी घेण्यात आली. ट्रायल म्हणून अहमदनगर ते पुणे ही बस मंगळवारी अहमदनगर येथून पुण्याकडे रवाना झाली. एसटी महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ ला नगर शहरातील माळीवाडा बस स्थानकातून पुण्याकडे रवाना झाली होती. बुधवारपासून अहमदनगर ते पुणे शिवाई इलेक्ट्रिक बस धावणार आहे.

एका चार्जिंग मध्ये सुमारे तीनशे किलोमीटर ही बस धावू शकणार आहे. पहिल्या दिवशी बुधवारी साडे नऊ वाजता व नंतर दररोज सात वाजता नगर येथून ही बस पुण्याकडे रवाना होणार आहे. अहमदनगर ते पुणे अशा चार फेऱ्या ही बस करणार आहे. मंगळवारी अहमदनगर ते पुणे या बसची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. मंगळवारी ट्रायलसाठी अहमदनगर येथून ही शिवाई ई-बस पुण्याकडे रवाना झाली. सरकार नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनं घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. सरकारकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवला जात आहे. आता एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक बसदेखील रस्त्यांवरून धावताना दिसणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस लवकरच राज्यभर धावताना दिसतील. याच मोहिमेतली राज्य परिवहन महामंडळाची पहिली इलेक्ट्रिक बस १ जून रोजी पुण्याहून अहमदनगरला रवाना होईल. विशेष म्हणजे १ जून हा एसटीचा स्थापना दिवस देखील आहे.

वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने वाहन क्षेत्रातील सर्वाधीक मोठा सार्वजनिक उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे . महाराष्ट्राची ‘लालपरी’अर्थात एसटी बस आज ‘१ जून २०२२’ अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केलंय . या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या शिवाय या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे . पुण्यात होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यानंतर हि पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे .

या बसची लांबी १२ मीटर आहे ,तर टू बाय टू ची आसन व्यवस्था असेल तसेच एकूण ४ ३ असने असतील . ध्वनी व प्रदूषणविरहित तसेच वातानुकूलित हि इलेक्ट्रिक बस असेल . हि बस ताशी ८० किमी वेगाने धावणार . हिची बॅटरी क्षमता ३२२ के . व्हि. असेल

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.