Sat. May 25th, 2019

‘मला पास करा, मला पाकिस्तानला धडा शिकवायचाय’

Female student at work

307Shares

परीक्षेमध्ये बऱ्याचदा उत्तर येत नसलं, की काहीही लिहून पानंच्या पानं भरून काढण्याचे प्रकार आपल्यातल्या बऱ्याचजणांनी केले असतील. काहीवेळा उत्तर येत नसताना काही चालू विद्यार्थी थेट सिनेमाच्या कथाच पेपरमध्ये लिहून येतात. आपण काय लिहिलंय हे खोलात जाऊन पेपर तपासणारे वाचणार नाहीत, आणि आपल्याला पूर्ण मार्क्स मिळतील, अशी त्यांची अपेक्षा असते. तर काहीवेळा विद्यार्थी पेपरमध्येच तपासणाऱ्यांसाठी सूचना लिहून आपल्याला पास करावं अशी विनंती करतात. अर्थात असं काही केलं, तरी त्याचा पेपर तपासणाऱ्यांने विचार न करता योग्य ते मार्क्स देणं अपेक्षित असतं. तरीही विद्यार्थी काही ना काही लिहून पास व्हायचा प्रयत्न करतच असतात. दिल्लीमध्ये तर एका विद्यार्थ्याने पेपरमध्ये उत्तर लिहिण्याऐवजी असं काही लिहिलं की वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

 

देशभक्ती उफाळून आली, की उत्तरंच आली नाहीत?

दिल्लीत सध्या यूपी बोर्डाची पेपर तपासणी चालू आहे.

यावेळी एका उत्तर पत्रिकेवर चक्क पेपर तपासणाऱ्यांसाठीच भावनिक संदेश देण्यात आला होता.

“माझे मामा शहीद झाले आहेत, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मला पास करा.” असा मजकूर पेपरमध्ये लिहिला होता.

उत्तर लिहिणाऱ्या विद्यार्थ्याचा हा अजब दावा वाचून शिक्षकही स्वत: भांबावून गेले.

अर्थात या भावनिक आवाहनाचा कोणताही परिणाम पेपर तपासणाऱ्यावर झाला नाही.

इतकंच काय तर “पास करा, नाहीतर देव तुम्हाला माफ करणार नाही“ असंही उत्तर पत्रिकेत एका विद्यार्थ्याने लिहिलेलं शिक्षकांना वाचायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *