यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन?

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयांचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. कोरोना काळात गेली दीड वर्षे विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने शिकवणी झाली. विद्यार्थ्यांच्या परिक्षासुद्धा ऑनलाईनपद्धतीनेच घेण्यात आल्या. मात्र यंदा कोरोना परिस्थिती स्थिरावल्यामुळे दहावी, बारवीच्या परिक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण विभागाची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
दहावी, बारावीच्या परिक्षा ऑफलाईन घेण्याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची उपस्थिती लावून त्यांची मते जाणून घेतली. तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्यास ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षांसाठी कोणकोणत्या खबरदारी घेण्याची आवशक्यता आहे, या मुद्द्यांवर जास्त भर देण्यात आला. तसेच शिक्षण विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेत निर्णय घेण्यात येणार असल्याचे बैठकित सांगण्यात आले.
गेल्या दीड वर्षांनी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय सुरू झाले. मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन घेण्याबाबत अद्याप शिक्षण विभागात संभ्रम आहे. त्याबाबत वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या परिक्षेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.