Wed. May 19th, 2021

Tik Tok मुळे हरवला, Whatsapp मुळे सापडला

Tik Tok चं वेड सध्या बऱ्याच जणांच्या अंगाशी येत असल्याचं दिसून येतंय. आंध्र प्रदेशातील एक विद्यार्थी Tik Tok वर व्हिडिओ बनवायला जंगलात शिरला आणि हरवला. अखेर Whatsapp मुळे त्याचा शोध लागला. हा थरार अजबच होता.

काय घडलं नेमकं?

चित्तूर जिल्ह्यात राहणारा मुरली हा विद्यार्थी पदवी शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो.

‘टिक टॉक’वर हटके व्हिडिओ बनवायला तो तिरुमाला टेकडीवरील सेशाचलम् जंगलात शिरला.

त्याला जंगलातून टेकडीच्या माथ्यावर जाऊन झेंडा रोवायचा होता आणि त्याचा व्हिडिओ बनवायचा होता.

रविवारी तो जंगलात गेला, डोंगरावर चढून झेंडा रोवल्याचा व्हिडिओदेखील बनवला.

मात्र परतताना मात्र जंगलात वाट हरवला.

जंगलात चकवा लागल्याने तो जंगलातून बाहेरच पड शकत नव्हता.

या जंगलात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे या जंगलात थांबणं धोक्याचं होतं.

अखेर मुरलीला एक युक्ती सुचली. TikTok फॅन असणाऱ्या मुरली Whatsapp ची मदत घेतली.

त्याने मित्राला Whatsapp Live Location पाठवलं आणि आपला शोध लागावा म्हणून मदत मागितली.

मुरलीच्या मित्राने लोकेशन मिळाल्यावर मुरलीच्या कुटुंबियांना माहिती दिली. तसंच पोलिसांचीही मदत घेतली.

पोलिसांनी लोकेशनवरून मुरलीचा शोध घेण्यासाठी पथकं जंगलात पाठवली.

अखेर सोमवारी रात्री 3 वाजता  मुरली बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

मुरलीवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने मुरलीवर कोणत्याही जंगली श्वापदाने हल्ला केला नव्हता. मात्र या जंगलात लाकडांची तस्करी करणाऱ्या तस्करांचाही धोका होता. Tik Tok व्हिडिओ करता यावा, म्हणून मुरलीने जीव धोक्यात घातला होता. मात्र Whatsapp वरच्या Live location च्या सुविधेमुळे त्याचे प्राण वाचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *