Sun. May 16th, 2021

धक्कादायक! शिक्षकाच्या मुलानं ‘PUBG’साठी सोडलं घर  

गुजरातमध्ये पबजी खेळणाऱ्यांवर बंदी आणली आहे. आतापर्यंत पबजी खेळल्याप्रकरणी 13 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. पबजी खेळण्याची सवय लागल्यानंतर काय-काय होऊ शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. गाझियाबादमध्ये 10 वीच्या एका विद्यार्थ्याने पबजी गेमसाठी घर सोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नेमकं काय घडलं ?

किशोर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी किशोरच्या वडिलाने सिहानी गेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

किशोरचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. किशोर हा मेरठमधील एका शाळेत दहावीत शिकत आहे.

तो अभ्यास सोडून फक्त पबजी गेम खेळत होता. तो स्वतःला एक चांगला पबजीचा खेळाडू समजायचा.

11 मार्च रोजी सायंकाळी बाहेर जाऊन येतो असे सांगून तो घराबाहेर पडला.

तो परत आलाच नाही. बराच वेळ झाला मुलगा घरी परत आला नाही म्हणून पालकांनी शोधाशोध सुरू केली.

त्याची लाल रंगाची स्कूटी नवीन बस स्थानकाजवळ मिळाली. त्यानंतर पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

किशोर हा पबजी गेमसाठी वेडा झाला होता. त्याचे कुटुंबाप्रती प्रेम सुद्धा कमी झाले होते. गेम खेळताना तो एका आयडी लॉगिनसोबत सतत चॅट करीत असायचा.

त्याने एका युजरला सांगितले होते की, नवीन अकाउंट बनवून मी आता त्याच्याशी चॅट करणार आहे. हे मेसेजमध्ये आढळले आहे.

विशेष म्हणजे या चॅटनंतर त्याने दुसऱ्याच दिवशी घर सोडले आहे.

घर सोडताना त्याने घरातील 15 हजार रुपये सुद्धा नेले आहे, असे किशोरच्या पालकांनी पोलिसांना सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *