Jaimaharashtra news

स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

राज्यसेवासह इतर स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही नेमणुका न दिल्याने तसेच, भविष्यातील स्पर्धा परीक्षांच्याबाबत धोरण निश्चित नसल्याने अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या याबाबतच्या समस्या मांडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष समरजितराजे घाटगे यांनी शिष्टमंडळासह मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी संबंधित सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.

Exit mobile version