Fri. Aug 12th, 2022

शाळेतच विद्यार्थ्यांना ‘असं’ मिळतंय घनकचरा व्यवस्थापनाचं शिक्षण

कोल्हापुरात महानगरपालिकेच्या शाळा कचरा संकलन केंद्र बनल्या आहेत.’सुका कचरा साठवा, शाळेत पाठवा’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थीदशेतच स्वच्छतेची सवय लागावी, या हेतूने प्रशासनाने सुरू केलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सर्वच शहरात कचऱ्याची समस्या पाहायला मिळतेय. वारंवार प्रशासनाकडून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून तो कचरा कुंडीत टाकण्याचे आवाहन केलं जातंय. मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना पाहायला मिळते. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने शालेयदशेतच विद्यार्थ्यांना याची सवय लावण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थी अपल्या घरातील सुका कचरा शाळेत येताना घेऊन येतात.

शाळेत ठेवलेल्या कचराकुंडीत हा सगळा कचरा जमा केला जातो.

तिथून तो कचरा स्वच्छता कर्मचार्यांकडे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी दिला जातो. विद्यार्थ्यांनाही आता याची सवय लागली आहे.

आपल्या घरातील सुका कचरा ते कचराकुंडीत टाकू देत नाहीत.

शिवाय आपल्या परिसरातील इतर घरांमध्येही ते जनजागृती करू लागले आहेत. त्यामुळे परिसर स्वच्छ होण्यास मदत होत आहे.

पालकांनाही याची आता चांगलीच जाणीव झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला येणारे काही पालकही कचरा घेऊन येत आहेत. मुलांना या उपक्रमामुळे चांगली सवय लागल्याचे ते सांगतात.

खरंतर घनकचरा व्यवस्थापन करणं ही मोठी डोकेदुखी असते. त्यातून शहरात मोठं मोठी डम्पिंग ग्राउंड पाहायला मिळतात. एकत्र येणाऱ्या कचऱ्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा वर्गीकरण करावं लागतं. या सगळ्यावर मात करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने राबवलेला हा उपक्रम भावी पिढीला जागृत नागरिक करणारा ठरतोय हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.