‘या’ शाळेत एक वर्षापासून विद्यार्थी साफ करतात शौचालय

मध्य प्रदेशमधील सिन्हारा जिल्ह्यातील  एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाळकरी विद्यार्थी शौचालय साफ करत आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेत असल्याने लोकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना  खांडवा गावातील असून प्राथमीक शाळेत घडलेली ही घटना आहे.

नेमकं प्रकरण काय?

आजकाल सोशल मीडीयामुळे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच एक संतापजनक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

त्यामध्ये खांडवा येथील एका शाळेत चक्क शाळकरी विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करुन घेतले जात आहे. या व्हायरल झाल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

या शाळेतील मुख्याध्यापकच विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेत असल्याची माहिती समोर  आली आहे. या बदल्यात विद्यार्थ्यांना त्यांचे गुण वाढवून देतो असे अमिष दाखवलं जात होत.

गेल्या एक वर्ष झाले हे विद्यार्थी शौचालय साफ करत आहेत. असं सांगण्यात येत आहे. परंतु शाळेतील शिक्षकांनी हा दावा फेटाळला आहे.

महिन्यातून दोनदा सफाई कामगार शौचालयाची सफाई करतो. विद्यार्थी मजल्यावरील टाईल्स आणि चिखल साफ करत असावेत असा खुलासा शाळेच्या मुख्याध्यापिका गुलाब सोनी यांनी केला आहे.

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version