Fri. Aug 6th, 2021

गृहपाठ न केल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या हातात भरल्या बांगड्या!

गृहपाठ न केल्यास त्याची विद्यार्थ्याला अनेकदा शिक्षा केली जाते. गुजरातच्या मेहसाणामध्ये मात्र विद्यार्थ्यांना गृहपाठ न केल्याबद्दल शिक्षकाकडून हातात बांगड्या भरण्याची शिक्षा केली गेली.

काय घडलं नेमकं?

गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा प्रकार घडलाय.

वर्गातल्या 3 विद्यार्थ्यांनी गृहपाठ केला नव्हता.

त्याबद्दल त्याची शिक्षा म्हणून मनुभाई प्रजापती या शिक्षकाने चक्क तिन्ही विद्यार्थ्यांच्या हातात बांगड्या भरल्या.

भर वर्गात इयत्ता 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अशी शिक्षा देण्यात आली.

या शिक्षेमुळे तिन्ही विद्यार्थी घाबरून गेले.

पुढील काही दिवस शाळेत जाणे टाळू लागले.

याबद्दल पालकांनी विचारलं असता त्यांनी घडला प्रकार सांगितला.

शाळेत यासंदर्भात शिक्षकांची चौकशी केली असता गृहपाठ न केल्याची विद्यार्थ्यांना लाज वाटावी, या उद्देशाने आपण ही शिक्षा दिली असल्याचं उत्तर शिक्षकांनी दिलं.

यासंदर्भात तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *