अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुन्हा लसीकरण होणार

अमेरिकेतील विद्यापीठांच्या लसीकरण धोरणामुळे परदेशात शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. ज्यांनी भारत बायोटेकची कोवॅक्सिन किंवा रशियन स्पुटनिक व्ही लस घेतली आहे ,अशा भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा लसीकरण करण्याचे आदेश अमेरिकेतील विद्यापीठांनी दिले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता न मिळालेल्या लशी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा लसीकरण करावे असे अमेरिकेतील विद्यापीठांनी सांगितले आहे.
विद्यापीठांच्या या आदेशानंतर दोन वेगळ्या लसी घेतल्याने त्याच्या दुष्परिणामांचा शक्यतेमुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. २५ वर्षांच्या मिलोनी दोशीने कोलंबिया यूनिवर्सिटी स्कूल ऑफ इंटरनेशनल आणि पब्लिक अफेयर्स येथे प्रवेश घेतला आहे. भारतात तिने कोवॅक्सिन लसीचे दोन डोस घेतले होते. मात्र तिला पुन्हा लसीकरण करण्यास सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत अमेरिकेतील औषधनिर्माण संस्थांच्या फायझर इंक, मॉडर्ना इंक, जॉन्सन अँड जॉन्सन यांनी तयार केलेल्या लशींचा मान्यता दिली आहे. दरवर्षी सुमारे २ लाख भारतीय विद्यार्थी अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. त्यापैकी बर्‍याच जणांना आता विद्यापीठांनी मंजूर केलेल्या लशींसाठी वेळापत्रक तयार करणे अवघड जात आहे.

Exit mobile version