Mon. Jul 26th, 2021

मित्रांनो गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नका – सुबोध भावे

पावसामुळे काही ठिकाणची वाहतुक रद्द करण्यात आली आहे. या पावसामध्ये अडकल्याचं टवीट् अभिनेते सुबोध भावे यांनीही केले आहे. ते तब्बल तीन तास ट्रेनमध्ये अडकले होते.

दोन दिवस झाले मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वेवाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. पावसामुळे काही ठिकाणची वाहतुक रद्द करण्यात आली आहे. या पावसामध्ये अडकल्याचं टवीट् अभिनेते सुबोध भावे यांनीही केले आहे. ते तब्बल तीन तास ट्रेनमध्ये अडकले होते.

सुबोध भावेंच टवीट्

मुंबई, उपनगरे, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे.

पावसामुळं काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या खोळंबल्या आहेत. या मुसळधार पावसाचा फटका अभिनेता सुबोध भावेलाही बसला आहे. तीन तास सुबोध ट्रेनमध्ये अडकला होता. त्यानं ट्वीट करुन नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.


विदर्भ एक्स्प्रेसहून मुंबईला येत असताना  वाशिंद स्थानकात तीन तास सुबोध अडकला होता. शेवटी तीन तासांनंतर त्यानं टॅक्सी करून तो घरी आला.  तसंच नागरिकांनाही त्यानं गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक, तसंच नाशिक- मुंबई रेल्वे वाहतूकही पूर्णपणे बंद आहे. प्रशासनानंही महत्त्वाचं काम असल्यास घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *