Thu. Dec 2nd, 2021

सुबोध भावेंसंह हे मराठी कलाकार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले..

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे सांगली, कोल्हापूरचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे विविध ठिकाणाहून मदत कऱण्याचं आवाहन केलं जातं आहे. त्यात मराठी कलाकारही पुढे सरसावले आहेत. अभिनेता सुबोध भावेनं याबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे सांगली, कोल्हापूरचे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे विविध ठिकाणाहून मदत कऱण्याचं आवाहन केलं जातं आहे. त्यात मराठी कलाकारही पुढे सरसावले आहेत. अभिनेता सुबोध भावेनं याबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे. याबाबत लवकरच माहिती देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे सुबोध भावेच्या “अश्रूंची झाली फुले” या नाटकाचे प्रयोगही रद्द करण्यात आले आहेत. कोल्हापूर, सातारा, कराड आणि सांगली या ठिकाणी हे प्रयोग होणार आहेत. याबद्दल सुबोध भावेनं व्हिडिओ प्रसिद्ध करून माहिती दिली आहे. तसंच नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयाची काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. तर, आगामी प्रयोगाची रक्कम पूरग्रस्तांना देत असल्याचंही जाहीर केलं आहे,

कोल्हापूरमध्ये  “अश्रूंची झाली फुले” चे प्रयोह रध्द

पश्चिम महाराष्ट्रात पुरपरिस्थीती गंभीर आहे. कोल्हापूरमध्ये एकूण 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाडमधील अडकलेल्या 24 जणांना बाहेर काढण्यात आले. तसेच आंबेवाडीमधील 99 टक्के तर प्रयाग चिखली मधील 85 टक्के कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे.

कोल्हापूरच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी सांगली शहरात पुरामुळे खुप गंभीर अवस्था आहे. कृष्णा नदीच्या पाण्यात मात्र वाढ झाली आहे. अनेक गावांमध्ये पाण्याचा वेढा असून मोठया प्रमाणात लोक अडकले आहेत. चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा असल्याने प्रशासनाची मदत वेळेत पोहोचत नाही.

या दोन्ही जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे विविध ठिकाणाहून मदत कऱण्याचं आवाहन केलं जातं आहे. त्यात मराठी कलकारही पुढे सरसावले आहेत. पुराच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना लवकरच मदत करण्यात येईल. त्याचे स्वरुप दोन दिवसांत जाहीर करू, असे अभिनेता सुबोध भावे याने म्हटले आहे. तशी फेसबुक पोस्ट सुबोध भावे यांनी लिहीली आहे.

या मदतीचे स्वरुप दोन दिवसांत जाहीर करू, असं सुबोध भावे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सुद्धा पुरात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अभिनेता सुबोध भावे याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, फक्त पैसे देऊन काम संपणार नाही हे माहिती आहे पण किमान सुरवात होते हे महत्त्वाचं आहे. सर्व मराठी कलाकार एकत्र येऊन पुढील काही दिवसात संकटात सापडलेल्या आमच्या बांधवांसाठी निश्चित आणि ठोस अशा जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध करून देतील. असं त्या फेसबुक पोस्टद्वारे सुबोध भावे यांनी म्हटलं आहे,

सुबोध भावेच्या “अश्रूंची झाली फुले” या नाटकाचे प्रयोगही रद्द करण्यात आले आहेत. कोल्हापूर, सातारा, कराड आणि सांगली या ठिकाणी हे प्रयोग होणार आहेत. याबद्दल सुबोध भावेनं व्हिडिओ प्रसिद्ध करून माहिती दिली आहे. तसंच नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयाची काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. तर, आगामी प्रयोगाची रक्कम पूरग्रस्तांना देत असल्याचंही जाहीर केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *