Wed. Jan 19th, 2022

काँग्रेसचं इंजिन आता बंद झालं आहे – सुधीर मुनगंटीवार

काँग्रेसचं इंजिन बंद झालं आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी ते इंजिन खराब झालं आहे. अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

काँग्रेसचं इंजिन बंद झालं आहे. एक अध्यक्ष, पाच कार्याध्यक्ष मिळून सहा लोकांनी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तरी ते इंजिन खराब झालं आहे. आता काँग्रेसची गाडी निवडणुकीत विजयाच्या दिशेन जाऊ शकत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. वर्ध्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामाचं भूमिपूजन तसंच लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

मुनगंटीवारांची काँग्रेसवर टीका

काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची कितीही स्वप्न बघितली तरी ते काही क्षण आनंद देऊ शकतात.

एवढे वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि फक्त मोदी हटावचा नारा देऊन निवडणुकीत प्रचार केला जातो.

47 वर्षांत तुम्ही कोणती विकासकाम केलीत. विकासकाम जनतेपुढं घेऊन जा असं आव्हान यावेळी करण्यात आलं.

विकासकाम करायची नाही आणि टीका करायची, जनतेपुढं मला पहा फुल वाहा म्हणत जायचं आता हे शक्य नाही.

जनतेला हे माहीत आहे त्यामुळ काँग्रेस आता पुढं जाऊ शकत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री महायुतीचाच मुनगंटीवारांना विश्वास

येणारा मुख्यमंत्री महायुतीचा होणार असून शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर समान वाटप होईल.

जागा वाटपाबाबत एकत्रित बसून चर्चा करून ठरवणार असल्याचही मुनगंटीवार म्हणाले.

वर्ध्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामाचं भूमिपूजन तसच लोकार्पण सोहळा पार पडला.

सेलू इथं नवीन बसस्थानकाच भूमिपूजन तर वर्ध्यात नवीन बसस्थानकाच लोकार्पण अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *